Pimpri Corona Update : रुग्णवाढीचा आलेख चढताच ! शहरात आज 1558 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख चढताच आहे. शहराच्या विविध भागातील 1519 आणि महापालिका हद्दीबाहेरील 39 अशा 1558 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे.

‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 277 आणि ‘ब’ कार्यालय हद्दीत 261 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 812 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 10 आणि महापालिका हद्दीबाहेरील 3 अशा 13 जणांचा आज मृत्यू झाला आहे.

त्यात आकुर्डीतील 64 वर्षीय पुरुष, पिंपळेसौदागर येथील 66 वर्षीय पुरुष, चिंचवड येथील 76 वर्षीय पुरुष, मोशीतील 69 वर्षीय पुरुष, वल्लभनगर येथील 68 वर्षीय पुरुष, कासारवाडीतील 76 वर्षीय पुरुष, दापोडीतील 65 वर्षीय पुरुष, चिखलीतील 69 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 75 वर्षीय महिला, भोसरीतील 72 वर्षीय महिला, खेड येथील 54 वर्षीय पुरुष, वडगावशेरीतील 67 वर्षीय पुरुष, पुण्यातील 72 महिला रुग्णाचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 25 हजार 71 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 11 हजार 216 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1933 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 810 अशा 2743 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 1980 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 990 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 1 लाख 2 हजार 321 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 4419 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.