Pimpri Corona Update : रुग्णसंख्येत मोठी घट! शहरात आज 10 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri Corona Update) कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. शहराच्या विविध भागातील केवळ 10 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.(Pimpri Corona Update) शहरातील 3 लाख 71 हजार 679 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 239 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 222 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Matka Adda in Aundh: औंध परिसरात मटका अड्ड्यावर छापा टाकून 26 जणांवर कारवाई

तर, 17 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहेत.(Pimpri Corona Update) आज दिवसभरात 29 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 79 हजार 881 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.