Pimpri Corona Update: मोठी रुग्णवाढ! शहरात आज 197 नवीन रुग्णांची नोंद, 96 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri Corona Update) कोरोना रुग्णांची वाढ सुरुच आहे.  शहराच्या विविध भागातील 197 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 96 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 61 हजार 70 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 716 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 698 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

PCMC News: पथदिवे खांब, फिडरपिलरला स्पर्श करु नका, महापालिकेचे आवाहन

तर, 18 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये (Pimpri Corona Update) दाखल आहे. आज दिवसभरात 1 हजार 680 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 39 हजार 518 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.