_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri Corona Update : शहरात आज 2146 नवीन रुग्णांची नोंद, 1943 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2 हजार 106 आणि महापालिका हद्दीबाहेरील 40 अशा 2 हजार 146 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर 1 हजार 943 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 68 जणांचा मृत्यू झाला.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1 हजार 943 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 43 आणि महापालिका हद्दीबाहेरील 25 अशा 68 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात 46 पुरुष आणि 22 महिला रुग्णांचा समावेश आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरात आजपर्यंत 2 लाख 26 हजार 72 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 2 लाख 633 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 3258 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 1654 अशा 4 हजार 912 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 6 हजार 888 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 3893 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 4 लाख 21 हजार 687 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.