Pimpri Corona Update : प्रशासनाचा गोंधळ, तीनवेळा प्रेसनोट बदलली; शहरात आज 1790 नवीन रुग्णांची नोंद, 2884 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागात कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. कोरोनाचा अहवाल तीनवेळा बदलण्यात आला आहे. शहराच्या विविध भागातील 1 हजार 790 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे. तर, 71 जणांचा मृत्यू झाला.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 2 हजार 884 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 46 आणि महापालिका हद्दीबाहेरील 25 अशा 71 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात 49 पुरुष आणि 22 महिला रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 2 लाख 36 हजार 209 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 2 लाख 11 हजार 871 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 3469 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 1776 अशा 5 हजार 245 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 5 हजार 930 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1011 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 4 लाख 43 हजार 15 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.