Pimpri Corona Update : कोरोनाचा विस्फोट ! शहरात आज 2 हजार 905 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2832 आणि महापालिका हद्दीबाहेरील 73, अशा 2 हजार 905 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. 

‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 423 आणि ‘ड’ कार्यालय हद्दीत 399 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1854 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 15 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 17 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात 11 पुरुष आणि 6 महिला रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 47 हजार 546 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 24 हजार 844 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2049 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 844 अशा 2893 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 3493 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 2293 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 1 लाख 74 हजार 746 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 14 हजार 814 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.