Pimpri Corona Update: कोरोना गेला! शहरात आज अवघ्या 2 नवीन रुग्णांची नोंद; 18 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

Pimpri Corona Update

एमपीसी न्यूज : – पिंपरी-चिंचवड शहरातून सद्यस्थितीत कोरोना विषाणू गेला आहे. शहराच्या विविध भागातील केवळ 2 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त  झालेल्या 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे सलग सातव्यादिवशी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. आजपर्यंत शहरातील 4 हजार 623 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 59 हजार 32 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 137 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 97 रुग्ण गृहविलगीकरणात असून 40 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 7 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 243 आहेत. आज दिवसभरात 54 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 34 लाख 62 हजार 31 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share