Pimpri Corona Update : कोरोनाचा कहर; पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी नवीन 3 हजार 382 रुग्णांची भर; 18 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 4) 3 हजार 382 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 1 हजार 791 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात कोरोनामुळे 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 1 लाख 50 हजार 928 एवढी झाली आहे. तर आजवर 1 लाख 26 हजार 635 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण चिखली (पुरुष, 63, 46, 76 वर्ष), थेरगाव (पुरुष, 58, 80 वर्ष), रहाटणी (पुरुष, 60 वर्ष), वाल्हेकरवाडी (पुरुष, 63 वर्ष), चिंचवड (पुरुष, 46 वर्ष), पिंपळे गुरव (पुरुष, 67, 60 वर्ष), दिघी (पुरुष, 58 वर्ष), मोशी (पुरुष, 35 वर्ष), यमुनानगर (महिला, 70 वर्ष), आळंदी रोड (महिला, 95 वर्ष), पिंपरी (महिला 36 वर्ष), दिघी (महिला, 30 वर्ष), जळगाव (पुरुष, 82 वर्ष), औरंगाबाद (महिला, 54 वर्ष) येथील आहेत.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 2 हजार 65 तर शहराच्या बाहेरील 846 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 22 हजार 228 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 18 हजार 685 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 3 हजार 543 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शहरातील 88 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 2 हजार 834 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी 8 हजार 401 जणांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली. आजवर शहरातील 1 लाख 83 हजार 147 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.