Pimpri Corona Update: कोरोनाचा उद्रेक! शहरात आज नवीन 3 हजार 159 रुग्णांची नोंद

1 हजार 712 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 3 हजार 159 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 1 हजार 712 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 532 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 5 हजार 518 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 17 हजार 615 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 17 हजार 32 रुग्ण गृहविलगीकरणात असून 583 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 118 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 627 आहेत. आज दिवसभरात 9 हजार 936 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 31 लाख 85 हजार 547 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.