Pimpri Corona Update: रविवारी 11 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, 13 जणांना डिस्चार्ज

Pimpri Corona Update Corona report of 11 people positive on Sunday, discharge of 13 people

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि. 31) 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे रुग्ण इंदिरानगर, चिंचवड स्टेशन, भाटनगर, रुपीनगर, पिंपरी, बौध्दनगर, वाल्हेकरवाडी, दत्तनगर या भागातील आहेत. तर आनंदनगर, दिघी, खडकी, ताडीवाला रोड, आंबेगाव येथील रहिवासी असलेल्या 13 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी सायंकाळपर्यंत शहरातील कोणताही भाग नव्याने सील करण्यात आलेला नाही.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 8 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. यामुळे शहरात आज  सायंकाळपर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा 522 वर पोहोचला आहे.

आजवर शहरातील 8 तर शहराबाहेरील 12 रुग्णांचा पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला आहे.

शहरातील 262 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 220 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील 32 जणांवर पुण्यात उपचार सुरू आहेत.

शहराच्या बाहेर वास्तव्यास असलेल्या परंतु शहरात उपचार घेतलेल्या 34 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

रविवारी 497 व्यक्तींचे अलगीकरण केले असून आजवर 14 हजार 310 जणांचे अलगीकरण केले आहे. आज 50 संशयितांना रुग्णालयात दाखल केले आहे. तर 109 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 188 जणांचे कोरोना चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

रविवारी 25 हजार 880 घरांना पालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिली आहे. त्यात 73 हजार 884 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like