Pimpri corona Update : कोरोनाचा कहर ! शहरात आज 2396 नवीन रुग्णांची नोंद, 1410 कोरोनामुक्त, 18 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. शहराच्या विविध भागातील 2288 आणि महापालिका हद्दीबाहेरील 108 अशा 2396 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 355 आणि ‘ब’ कार्यालय हद्दीत 345 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1410 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 15 आणि महापालिका हद्दीबाहेरील 3 अशा 18 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात 14 पुरुष आणि चार महिला रुग्णाचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 40 हजार 138 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 20 हजार 322 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 2003 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 837 अशा 2840 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3045 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 3112 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

आजपर्यंत 1 लाख 35 हजार 561 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 4285 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.