Pimpri Corona Update: नगरसेविकेच्या पतीला कोरोनाची लागण

Pimpri Corona Update: Corporator's husband infected with corona काही नगरसेवकांनीही कोरोनाची तपासणी करुन घेतली आहे. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका नगरसेविकेच्या पतीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या हायरिस्क कॉन्टॅक्ट मध्ये आलेल्यांची तपासणी केली जाणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. दररोज 80 हून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. आजपर्यंत 1330 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाविरोधात लढणा-या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

महापालिकेतील एका नगरसेविकेच्या पतीलाही कोरोनाची बाधा झाली आहे.  त्रास होत असल्याने त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या हायरिस्क  कॉन्टॅक्ट मध्ये आलेल्यांची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, काही नगरसेवकांनीही कोरोनाची तपासणी करुन घेतली आहे. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.