Pimpri Corona Update: रुग्णसंख्या घटली! शहरात आज 29 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.(Pimpri Corona Update) शहराच्या विविध भागातील केवळ 29 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 112 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 627 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. (Pimpri Corona Update) शहरातील 3 लाख 68 हजार 996 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 411 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 382 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Chakan Vehicle theft: चाकण पोलिसांकडून 3 दुचाकी चोर अटकेत, 25 दुचाकी केल्या जप्त

तर, 29 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहे.(Pimpri Corona Update) आज दिवसभरात 646 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 30 हजार 999 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.