Pimpri Corona Update: रुग्णसंख्या घटली! शहरात आज 41 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड  शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. 150 पर्यंत गेलेली रुग्णसंख्या 50 च्या आतमध्ये आली आहे. (Pimpri Corona Update) शहराच्या विविध भागातील 41 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 54 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 626 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 68 हजार 473 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 712 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 685 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Hockey Competition : हॉकी स्पर्धेला सुरुवात;  23 संघांचा सहभाग

तर, 27 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहे. (Pimpri Corona Update) आज दिवसभरात 199 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 25 हजार 56 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.