Pimpri Corona Update : शहरात आज 476 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 237 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 237 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 476 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 5 आणि महापालिका हद्दीबाहेरील 4 अशा 9 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 235 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 54 हजार 526 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 1 हजार 276 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 207 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार 69 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 79 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 620 आहेत. आज दिवसभरात 1 हजार 979 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 5 लाख 33 हजार 527 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.