-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri Corona Update : शहरात आज 442 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 240 नवीन रुग्णांची नोंद

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 240 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 442 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 7 आणि महापालिका हद्दीबाहेरील 5 अशा 12 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 217 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 53 हजार 713 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

सध्या 2 हजार 320 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 565 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार 755 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 91 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 650 आहेत. आज दिवसभरात 2 हजार 573 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 5 लाख 26 हजार 563 जणांनी लस घेतली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.