Pimpri Corona Update : रुग्णवाढ थांबेना ! शहरात आज 1846 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1825 आणि महापालिका हद्दीबाहेरील 39 अशा 1864 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 301 आणि ‘ब’ कार्यालय हद्दीत 297 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 886 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील सात आणि महापालिका हद्दीबाहेरील सहा अशा 13 जणांचा आज मृत्यू झाला.

त्यात निगडीतील 72 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 81,66, 30 वर्षीय तीन पुरुष, चिखलीतील 50 वर्षीय पुरुष, चिंचवड येथील 80 वर्षीय पुरुष, च-होलीतील 37 वर्षीय महिला, सोलापूर येथील 79 वर्षीय पुरुष, लोहगावमधील 40 वर्षीय पुरुष, पुण्यातील 83 वर्षीय पुरुष, तळेगावातील 70 वर्षीय महिला, जुन्नर येथील 40 वर्षीय महिला, खेड येथील 60 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. मागील चोवीस तासात कोरोनामुळे पाच मृत्यू झाले. आधी मृत झालेल्या पाच केसेस आज कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढलेला दिसून येत आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 30 हजार 572 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 1 लाख 13 हजार 648 जण बरे होऊन घरी गेले.

शहरातील 1957 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 827 अशा 2784 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 2262 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1085 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 1 लाख 16 हजार 141 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 4684 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.