Pimpri Corona Update : रुग्णवाढ थांबेना ! शहरात आज 2137 नवीन रुग्णांची नोंद, 1161 कोरोनामुक्त, 17 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या थांबता थांबत नाही. रुग्णसंख्येतील वाढ सुरुच आहे. शहराच्या विविध भागातील 2113 आणि महापालिका हद्दीबाहेरील 24 अशा 2137 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली आहे.

‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 399 आणि ‘ड’ कार्यालय हद्दीत 341 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1161 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 15 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 17 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात 11 पुरुष आणि सहा महिला रुग्णाचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 251 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 21 हजार 483 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2018 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 839 अशा 2857 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 3360 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 2085 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 1 लाख 46 हजार 643 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 11082 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.