Pimpri Corona Update: ‘ओमायक्रॉन’च्या संकटात मोठा दिलासा! शहरात नवीन 17 रुग्णांची नोंद, 21 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या नवीन विषाणूचे रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना एक दिलासा मिळाला आहे. शहरातील नवीन रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून विविध भागातील केवळ 17 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 21 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 1 रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 513 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 77 हजार 722 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 337 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 124 रुग्ण गृहविलगीकरणात असून 213 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 24 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 254 आहेत. आज दिवसभरात 15 हजार 690 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 26 लाख 86 हजार 852 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.