Pimpri Corona Update : मोठा दिलासा ! रुग्णसंख्या हजाराच्या आत, आज 959 नवे रुग्ण, 2105 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. शहरातील रुग्णसंख्या एक हजाराच्या आतमध्ये आली आहे. शहराच्या विविध भागातील 959 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 2 हजार 105 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 44 आणि महापालिका हद्दीबाहेरील 35 अशा 79 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 3 हजार 606 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 40 हजार 820 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 19 हजार 423 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 13 हजार 775 रुग्ण गृहविलगीकरणात असून 5 हजार 648 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 306 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या 2 हजार 80 वर गेली आहे. आजपर्यंत 4 लाख 62 हजार 65 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.