Pimpri corona Update : शहरात आज 1190 नवीन रुग्णांची नोंद; 1071 जणांना डिस्चार्ज, 21 मृत्यू

सध्या 6415 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1104 आणि हद्दीबाहेरील 86 अशा 1190 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) भर पडली आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 66 हजार 483 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1071 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

शहरातील 12 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 9 अशा 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

चिंचवड, चिखली, कोकनेनगर, सांगवी, तळवडे, पिंपरी, संत तुकारामनगर, भोसरी, दापोडी, खेड, मारुंजी, जुन्नर, लोहगाव, कामशेत, मावळ, आंबेगाव, चाकण येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 66 हजार 483 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 52 हजार 530 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1077 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 313 अशा 1390 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 6415 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.