Pimpri Corona Updat: शहरात आज 460 नवीन रुग्ण, 833 जणांना डिस्चार्ज तर 18 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 833 जणांना आज (सोमवारी) डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहराच्या विविध भागातील 446 आणि पालिका हद्दीबाहेरील 14 अशा 460 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 80 हजार 923 झाली आहे.

शहरातील 13 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 5 अशा 18 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.

त्यात काळेवाडीतील 70, 47 वर्षीय दोन पुरुष, चिखलीतील 60, 69 वर्षीय दोन पुरुष, खराळवाडीतील 72 वर्षीय वृद्ध, किवळेतील 65 वर्षीय पुरुष, चिंचवड येथील 64, 53 वर्षीय दोन पुरुष, थेरगांवातील 89 वर्षीय वृद्ध, कासारवाडीतील 59 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 39 वर्षीय महिला, आकुर्डीतील 68 वर्षीय आणि संत तुकारामनगर येथील 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

तर, पालिका हद्दीबाहेरील पुरंदर येथील 57 वर्षीय पुरुष, धावडीतील 69 वर्षीय, पुण्यातील 91 वर्षीय वृद्ध, हिवरेतील 58 वर्षीय पुरुषाचा आणि खेड येथील 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 80 हजार 923 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 74 हजार 504 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1374 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 523 अशा 1897 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 3451 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.