Pimpri Corona Update : निच्चांकी रुग्णसंख्या! शहरात आज 76 रुग्णांची नोंद

409 जणांना डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 76 आणि पालिका हद्दीबाहेरील 3 अशा 79 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांनंतरची आजची रुग्णसंख्या सर्वांत निच्चांकी आहे. ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 88 हजार 878 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 409 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील आज आकुर्डीतील 66 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. काल शहरातील एकाचाही मृत्यू झाला नव्हता. शहरातील मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे. हे मोठे आशादायक चित्र आहे.

शहरात आजपर्यंत 88 हजार 878 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 85 हजार 884 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1547 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 639 अशा 2186 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 760 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 966 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.