Pimpri corona Update : सक्रिय रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त जास्त; आज 1188 जणांना डिस्चार्ज, 997 नवीन रुग्ण, 16 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्णांची संख्या जास्त आहे. शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1188 जणांना आज (मंगळवारी) डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, शहराच्या विविध भागातील 997 नवीन रुग्णांची भर पडली असून शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 65 हजार 379 वर पोहोचली आहे.

शहरातील 9 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 7 अशा 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. निगडी, बिजलीनगर, विद्यानगर, पिंपळेगुरव, काळेवाडी, चिंचवडगाव, संभाजीनगर, देहूरोड, चाकण, देहूगाव, कराड, कामशेत, मारुंजी, राजगुरूनगर येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 65 हजार 379 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 51 हजार 510 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1065 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 304 अशा 1369 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 6407 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.