Pimpri Corona Update: सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त

Pimpri Corona Update: More patients recover than active corona patients

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील 673 जणांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 382 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर, सध्या 279 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. आज शुक्रवारी (दि.5) दुपारी अडीच वाजेपर्यंत शहरातील 38 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. काही दिवस रुग्ण संख्येत वाढ होत 12 पर्यंत पोहचली होती. दरम्यानच्या काळात नवीन एकही रुग्ण सापडला नव्हता.

परंतु, त्यानंतर एप्रिल पासून दररोज रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. बघता बघता कोरोनाने संपूर्ण शहराला विळखा घातला. झोपडपट्टीसह शहाराच्या संपूर्ण भागात कोरोनाचे रुग्ण आहेत.

दररोज शहराच्या नवीन भागात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे ही चिंतेची बाब मानली जात आहे. 10 मार्च ते 5 जून दरम्यान रुग्ण संख्या 673 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

शहरातील 673 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 382 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर, सध्या 279 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

यामुळे सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. तर, शहरातील 12 जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

आज शुक्रवारी (दि.5) दुपारी अडीच वाजेपर्यंत 38 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, कोरोनामुक्त झालेल्या तिघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

115 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत

शहरातील 279 सक्रिय रुग्णांपैकी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. पण, लक्षणे काहीच नाहीत असे 115 रुग्ण आहेत. तर, 112 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांची वाढ होवू लागली आहे.

पहिल्यांदा लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या बोटावर मोजण्या इतकी होती. आता त्यामध्ये वाढ होत असून ही चिंतेची बाब मानली जात आहे.

19 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 12 जणांचा मृत्यू आजपर्यंत झाला आहे. तर, 382 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

सर्वाधिक 282 तरुणांना कोरोनाची बाधा

पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांना कोरोनाने अशरक्ष: विळखा घातला आहे. 22 ते 39 वयवर्ष असलेल्या शहरातील तब्बल 282 तरुणांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे.

त्याखालोखाल 40 ते 59 वयोगटातील प्रौढांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 149 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 86 किशोरवयीन मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 78 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.

याशिवाय 60 वर्षापुढील 77 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.