Pimpri corona Update: नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त; आज 1031 जणांना डिस्चार्ज, 598 नवीन रुग्ण

शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 49 हजार 330 झाली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1031 जणांना आज (सोमवारी) डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहराच्या विविध भागातील 593 आणि पालिका हद्दीबाहेरील 5 अशा 598 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 49 हजार 330 झाली आहे.

आज 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये मोशी, चिखली, चिंचवड, थेरगाव, भोसरी, रहाटणी, रावेत, संभाजीनगर आणि खेड येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

शहरात आजपर्यंत 49 हजार 330 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 34 हजार 842 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 866 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 186 अशा 1052 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 5456 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.