Pimpri Corona Update : Pimpri news: नवीन रुग्णसंख्या घटली पण मृत्यू वाढले, शहरात आज 1841 नवीन रुग्णांची नोंद; 41 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची नवीन रुग्णसंख्येचा आकडा थोडा कमी झाला आहे. शहराच्या विविध भागातील 1 हजार 838 आणि महापालिका हद्दीबाहेरील 3 अशा 1 हजार 841 नवीन रुग्णांची आज  (मंगळवारी) नोंद झाली आहे. तर, तब्बल 41 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 2812 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 25 आणि महापालिका हद्दीबाहेरील 13 अशा 41 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात 24 पुरुष आणि 17 महिला रुग्णांचा समावेश आहे.

मागील चोवीस तासात 12 मृत्यू झाले आहेत. यापूर्वी मृत्यू झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला असल्याचे वैद्यकीय विभागाने सांगितले आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 71 हजार 802 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 45 हजार 276 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2223 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 914 अशा 3137 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 5557 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 4213 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 2 लाख 67 हजार 305 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

_MPC_DIR_MPU_II

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.