Pimpri Corona Update: दिलासा! शहरात एकही मृत्यू नाही, 35 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असून मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही. ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. शहराच्या विविध भागातील 35 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 41 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आजपर्यंत शहरातील 4 हजार 508 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 77 हजार 384 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 360 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 146 रुग्ण गृहविलगीकरणात असून 214 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 20 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 254 आहेत. आज दिवसभरात 10 हजार 389 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 25 लाख 35 हजार 672 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.