Pimpri corona Update : शहरात आज कोरोनामुळे एकही मृत्यू नाही; 110 नवीन रुग्णांची नोंद, 150 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे आज (शनिवारी) एकही मृत्यू झाला नाही, ही बाब आशादायक आहे. शहराच्या विविध भागातील 110 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 150 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 98 हजार 738 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 95 हजार 412 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1785 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 745 अशा 2530 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या 674 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 2442 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे, हे मोठे आशादायक चित्र आहे. मृत्यू दर कमी होत आहे हे दिलासादायक आहे. आज शहरातील आणि शहराबाहेरील एकाचाही मृत्यू झाला नाही.