Pimpri Corona Update: शहरात आज 55 नवीन रुग्णांची नोंद; 118 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 55 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. (Pimpri Corona Update) तर, कोरोनामुक्त झालेल्या 118 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 627 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.(Pimpri Corona Update) शहरातील 3 लाख 68 हजार 789 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 567 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 542 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Tree Plantation: मराठवाडा जनविकास संघ, वृक्षदायी प्रतिष्ठानतर्फे एक हजार वृक्षांची लागवड; विद्यार्थ्यांना ध्वज वाटप

तर, 25 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 617 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 27 हजार 230 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.