Pimpri corona Update : रुग्ण वाढताहेत ! शहरात आज 192 नवीन रुग्णांची नोंद, 173 जणांना डिस्चार्ज, पाच मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 192 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 90 हजार 481 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 173 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील चार आणि पालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये आळंदीरोड येथील 55 वर्षीय पुरुष, आकुर्डीतील 75 वर्षीय वृद्ध महिला, काळेवाडीतील 65 वर्षीय महिला, पिंपरीतील 84 वर्षीय वृद्ध महिला आणि पालिका हद्दीबाहेरील तळेगाव रोड येथील 62 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 90 हजार 481 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 87 हजार 171 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1586 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 656 अशा 2242 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 648 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1107 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.