Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी नवीन 94 रुग्णांची भर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 27) पिंपरी-चिंचवड शहरात 94 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 104 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 96 हजार 137 एवढी झाली आहे. तर आजवर 92 हजार 779 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी शहरातील पाच तर शहराच्या बाहेरील तीन रुग्णांचा मृत्यू झाला.

मृत्यू झालेले शहरातील रुग्ण पिंपरी (62 वर्ष), भोसरी (62 वर्ष), (72 वर्ष), तळवडे (74 वर्ष), दिघी (65 वर्ष) येथील आहेत. तर शहराच्या बाहेरील रुग्ण तळेगाव दाभाडे (61 वर्ष), चाकण (63 वर्ष), जुन्नर (58 वर्ष) येथील आहेत.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 750 तर शहराच्या बाहेरील 720 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 766 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 842 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 71 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 1 हजार 421 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.