Pimpri Corona Update: शहरात आज 61 नवीन रुग्णांची नोंद; 113 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 61 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. (Pimpri Corona Update) तर, कोरोनामुक्त झालेल्या 113 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 626 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 68 हजार 646 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 628 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 602 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Vehicle Theft: वाहनचोरी करणाऱ्या सराईताला बेड्या ठोकत चार गुन्ह्यांची उकल

तर, 26 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहे. (Pimpri Corona Update) आज दिवसभरात 478 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 26 हजार 9 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.