Pimpri Corona Update: शहरात आज 143 नवीन रुग्णांची नोंद; 144 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 143 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. (Pimpri Corona Update) तर, कोरोनामुक्त झालेल्या 144 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 625 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.(Pimpri Corona Update) शहरातील 3 लाख 67 हजार 904 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 936 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 912 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

तर, 24 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 456 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 17 हजार 922 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.