Pimpri corona Update : रेकोर्डब्रेक रुग्णवाढ ! शहरात आज 1471 नवीन रुग्णांची नोंद, 1527 जणांना डिस्चार्ज, 35 मृत्यू

शहरातील 18 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 17 अशा 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. शहराच्या विविध भागातील 1363 आणि महापालिका हद्दीबाहेरील 108 अशा 1471 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) भर पडली आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 62 हजार 594 वर पोहोचली आहे. शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1527 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 18 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 17 अशा 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

निगडी, भोसरी, चिंचवड, खराळवाडी, चिखली, आकुर्डी, रहाटणी, दिघी, च-होली, वाकड, काळेवाडी, सांगवी, थेरगाव, भोर, देहूगाव, येरवडा, कसबा पेठ, शिवणे, हडपसर, इंदापूर, जुन्नर, खेड येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

शहरात आजपर्यंत 62 हजार 594 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 48 हजार 403 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1026 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 274 अशा 1300 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 6624 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.