Pimpri corona Update : धोका वाढला ! शहरात आज 1303 नवीन रुग्णांची नोंद

'ड' क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 238 नवीन रुग्ण सापडले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1296 आणि महापालिका हद्दीबाहेरील 7 अशा 1303 नवीन रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. मागील काही महिन्यातील आजची रुग्णवाढ उच्चांकी आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 238 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 406 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील पाच आणि महापालिका हद्दीबाहेरील चार अशा नऊ जणांचा आज मृत्यू झाला आहे.

चिंचवड येथील 64 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 65 वर्षीय पुरुष, मोशीतील 75 वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव येथील 75 वर्षीय पुरुष, शिवतेजनगर येथील 70 वर्षीय महिला, कोथरूड येथील 75 वर्षीय पुरुष, वाकडेवाडीतील 55 वर्षीय पुरुष, सातारा येथील 69 वर्षीय पुरुष आणि करमाळा येथील 71 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 18 हजार 192 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 1 लाख 7 हजार 502 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1893 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 796 अशा 2689 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 1886 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1582 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 80 हजार 897 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 4048 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.