Pimpri corona Update : शहरात एक हजार 6 जणांचे चाचणी अहवाल पॉझिटीव्ह; 7 रुग्णांचा मृत्यू

शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 46 हजार 516 झाली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील आज (शुक्रवारी, दि. 28) एक हजार 6 रुग्णांचे तर शहराच्या बाहेरील 42 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 46 हजार 516 झाली आहे.

दिवसभरात महापालिका हद्दीतील दोन आणि हद्दीच्या बाहेरील 5 अशा एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 246 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 5 हजार 644 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

शुक्रवारी 246 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 32 हजार 109 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शुक्रवारी शहरातील 2 रुग्णांचा तर शहराच्या बाहेरील 5 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज मृत झालेले रुग्ण दिघी (स्त्री 65 वर्ष ) भोसरी (पुरुष 78 वर्ष ) शिंगोली (पुरुष 67 वर्ष ) देहूगांव (पुरुष 57 वर्ष ) मुळशी (पुरुष 73 वर्ष ) तळेगांव (स्त्री 65 वर्ष ) आळंदी (पुरुष 74 वर्ष ) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील 42 रुग्णांचे आज निदान झाले. सध्या 770 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 178 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एक हजार 784 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 311 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.