Pimpri corona Update : शहरात आज 104 नवीन रुग्णांची नोंद, 62 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 100 आणि महापालिका हद्दीबाहेरील 4 अशा 104 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 62 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

खडकी येथील 56 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 1868 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 98 हजार 27 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1827 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 771 अशा 2598 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 707 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 596 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 1 हजार 3542 जणांनी लस घेतली आहे.

आज दिवसभरात 600 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. ज्याने कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना आजपासून दुसरा डोस देण्यास सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.