Pimpri corona Update : शहरात आज 113 नवीन रुग्णांची नोंद, 31 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 110 आणि महापालिका हद्दीबाहेरील 3 अशा 113 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील चिंचवड येथील 30 वर्षीय युवकाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 227 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 96 हजार 519 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1807 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 759 अशा 2566 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 584 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1168 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 4880 जणांचे लसीकरण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.