Pimpri corona Update : शहरात आज 118 नवीन रुग्णांची नोंद, 213 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 113 आणि महापालिका हद्दीबाहेरील 5 अशा 118 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 213 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील मृत्यूदर कमी झाला आहे. कोरोनामुळे आज एकाचाही मृत्यू झाला नाही.

शहरात आजपर्यंत 99 हजार 142 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 95 हजार 855 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1789 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 749 अशा 2538 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 649 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 3248 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.