Pimpri corona Update : शहरात आज 133 नवीन रुग्णांची नोंद, 134 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 133 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 134 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

मंचर येथील एका 65 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 1381 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 97 हजार 792 जण बरे होऊन घरी गेले.

शहरातील 1826 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 769 अशा 2595 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 668 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 668 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 1 हजार 1320 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 620 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.