Pimpri Corona Update : चिंतेत भर ! शहरात आज 1341 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1326 आणि महापालिका हद्दीबाहेरील 15 अशा 1341 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 258 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 641 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील चार आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन अशा सहा जणांचा आज मृत्यू झाला आहे.

चिंचवड येथील 60, 85 वर्षीय तीन पुरुष, वल्लभनगर येथील 67 वर्षीय महिला, हिंजवडीतील 80 वर्षीय पुरुष, आळंतील 70 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 19 हजार 518 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 8 हजार 143 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1897 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 798 अशा 2695 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 1807 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1382 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 85 हजार 534 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 4637 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.