Pimpri corona Update : शहरात आज 167 नवीन रुग्णांची नोंद, 158 जणांना डिस्चार्ज; 5 मृत्यू

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात आज (शनिवारी) 167 नवीन रुग्णांची नोंद झाली. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 158 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महापालिका हद्दीतील चार आणि पालिका हद्दीबाहेरील एक अशा पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये पिंपळेगुरव येथील 65 वर्षीय पुरुष, भोसरीतील 68 वर्षीय पुरुष, नेहरुनगर येथील 69 वर्षीय पुरुष, दापोडीतील 53 वर्षीय महिला, जुन्नर येथील 67 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 97 हजार 790 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 94 हजार 316 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1772 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 736 अशा 2508 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 573 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 3094 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

इंग्लडहून आलेल्या एकाचा अहवाल प्रलंबित !

इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 7 प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआयव्ही) UK स्ट्रेन करीता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविले होते. त्यात तिघांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर, तर तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचे UK स्ट्रेन B.1.1.7 चा रिपोर्ट पॉझिटीव्ह असून तिघांची प्रकृती चांगली आहे. एकाचा अहवाल प्रलंबित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.