Pimpri Corona Update : शहरात आज 1818 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1811 आणि महापालिका हद्दीबाहेरील 7 अशा 1818 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 346 आणि ‘ड’ कार्यालय हद्दीत 298 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 722 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील सात आणि महापालिका हद्दीबाहेरील सहा अशा 13 जणांचा आज मृत्यू झाला आहे.

त्यात संत तुकारामनगर येथील 72 वर्षीय पुरुष, फुगेवाडीतील 59 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 78 वर्षीय पुरुष, चिंचवड येथील 78 वर्षीय पुरुष, सांगवीतील 64 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 65 वर्षीय महिला, दिघीतील 65 वर्षीय महिला, जुन्नर येथील 65 वर्षीय पुरुष, पाबळमधील 76 वर्षीय पुरुष, खडकीतील 53 वर्षीय पुरुष, पुण्यातील 72 वर्षीय पुरुष, चाकणमधील 57 वर्षीय महिला, पुण्यातील 56 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.

मागील चोवीस तासात सहा मृत्यू झाले आहे. आधी मृत झालेल्या पाच केसेस आज कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढलेला दिसून येत आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 28 हजार 747 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 12 हजार 762 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1950 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 821 अशा 2771 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 2235 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1949 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 1 लाख 11 हजार 478 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 4451 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.