Pimpri corona Update : शहरात आज 207 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 202 आणि महापालिका हद्दीबाहेरील 5, अशा 207 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील दोघांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. पिंपरीतील 70 वर्षीय पुरुष, भोसरीतील 70 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 2900 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 98 हजार 191 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1830 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 771 अशा 2601 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 909 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1232 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 17 हजार 798 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 1273 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.