Pimpri Corona Update : शहरात आज 2131 नवीन रुग्णांची नोंद, 1919 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2 हजार 131 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. तर, 1 हजार 919 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 64 जणांचा मृत्यू झाला.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1 हजार 919 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 40 आणि महापालिका हद्दीबाहेरील 24 अशा 64 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात 43 पुरुष आणि 21 महिला रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 2 लाख 28 हजार 203 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 2 लाख 2 हजार 552 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 3298 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 1678 अशा 4 हजार 976 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 6 हजार 933 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 4258 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 4 लाख 28 हजार 592 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.