Pimpri Corona Update : शहरात आज 2148 नवीन रुग्णांची नोंद, 2183 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2 हजार 148 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे. तर, 2 हजार 183 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 65 जणांचा मृत्यू झाला.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 2 हजार 183 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 41 आणि महापालिका हद्दीबाहेरील 24 अशा 65 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात 50 पुरुष आणि 15 महिला रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 2 लाख 21 हजार 448 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 97 हजार 372 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 3173 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 1604 अशा 4 हजार 777 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 7 हजार 858 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 2962 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 4 लाख 4 हजार 640 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.