Pimpri Corona Update : शहरात आज 2 हजार 196 नवीन रुग्णांची नोंद; 16 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2152 आणि महापालिका हद्दीबाहेरील 44 अशा 2 हजार 196 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 386 आणि ‘ब’ कार्यालय हद्दीत 356 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1815 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 14 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 16 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात 10 पुरुष आणि 6 महिला रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 53 हजार 80 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 28 हजार 450 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2079 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 848 अशा 2927 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 3804 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1055 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 1 लाख 98 हजार 784 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 15 हजार 391 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.