Pimpri Corona Update : शहरात आज 265 नवीन रुग्णांची नोंद, 171 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 265 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. तर उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 171 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 2 आणि महापालिका हद्दीबाहेरील 3 अशा 5 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 288 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 58 हजार 53 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 1 हजार 460 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 330 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार 130 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 45 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 431 आहेत. दिवसभरात 7 हजार 888 जणांनी लस घेतली. आजपर्यंत 6 लाख 59 हजार 698 जणांनी लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.