Pimpri corona Update : शहरात आज 2710 नवीन रुग्णांची नोंद; 54 मृत्यू

एमपीसी न्यूज – मागील पाच दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बळींचे प्रमाण वाढत आहे. आज (शुक्रवारी) 54 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद माहिती महापालिकेकडे झाली आहे. तर, शहराच्या विविध भागातील 2 हजार 529 आणि महापालिका हद्दीबाहेरील 181 अशा 2 हजार 710 नवीन रुग्णांची नोंद झाली.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 2872 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 32 आणि महापालिका हद्दीबाहेरील 22 अशा 54 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात 38 पुरुष आणि 16 महिला रुग्णांचा समावेश आहे.

मागील चोवीस तासात 13 मृत्यू झाले आहेत. यापूर्वी मृत्यू झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला असल्याचे वैद्यकीय विभागाने सांगितले.

शहरात आजपर्यंत 1 लाख 77 हजार 934 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 53 हजार 610 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2317 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 980 अशा 3297 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 7 हजार 22 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 7 हजार 860 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 2 लाख 87 हजार 726 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.